मायक्रोबायोम म्हणजे काय?
प्रस्तावना आपल्या शरीरात आपण एकटेच राहतो असं आपल्याला वाटतं, पण खरं तर आपण कोट्यवधी सूक्ष्मजीवांसोबत राहतो. मानवी शरीरात साधारण १०० ट्रिलियनपेक्षा जास्त सूक्ष्मजीव असतात. हे जीवाणू, फंगस, विषाणू व इतर सूक्ष्मजीव एकत्रित मिळून जे साम्राज्य तयार करतात त्यालाच मायक्रोबायोम (Microbiome) असं म्हटलं जातं. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गट मायक्रोबायोम – पोटात राहणारे सूक्ष्मजीव. पचन, रोगप्रतिकारशक्ती, मेंदूचे कार्य, त्वचेचं आरोग्य, लठ्ठपणा, मानसिक स्थिती – या सर्वांवर या मायक्रोबायोमचा खोल परिणाम होतो. आयुर्वेदात याचं मूळ अग्नि, आहार रस, त्रिदोष, ओज या संकल्पनांमध्ये दडलेलं आहे. मायक्रोबायोम म्हणजे काय? Microbiota म्हणजे शरीरात राहणारे सूक्ष्मजीव (जिवाणू, फंगस, व्हायरस). Microbiome म्हणजे त्या सर्वांचा एकत्रित समुदाय + त्यांचं जीनोम. मानवी शरीरातील पेशींइतकेच सूक्ष्मजीव आपल्या शरीरात आहेत – म्हणजे आपण अर्धे मानवी पेशी आणि अर्धे सूक्ष्मजीव! गट मायक्रोबायोम (Gut Microbiome) आपल्या पोटात आणि आतड्यांत लाखो प्रकारचे जीवाणू राहतात. त्यांची मुख्य का...